जगदंबामाता मदिंर, टाहाकारी
महाराष्ट्रातही अतिशय सुंदर, घडीव आणि अप्रतिम शिल्पकामाने सजवलेली प्राचीन मंदिरे अस्तित्वात आहेत याची माहिती अनेकांना नसते.महाराष्ट्रात प्रामुख्याने दगडी बांधकामाची आणि अप्रतिम कोरीव नक्षीकामाने सजवलेली जी देवळे दिसतात ती बरेचदा हेमाडपंती या नावाने ओळखली जातात.टाहाकारीचे जगदंबा मंदिर ,वेरूळचे घृष्णेश्वराचे मंदिर, अंबरनाथचे शंकराचे मंदिर, नाशिकजवळील गोंदेश्वर मंदिर, गोदावरीच्या तीरावरील मंदिरे, कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा कळस, ज्योतिबाच्या डोंगरावरची देवळे, शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव,.
हयहैय, यादव, चालुक्य हे तत्कालीन राजे शिवभक्त आणि देवीचेभक्त असल्याने महाराष्ट्रात हेमाडपंती बांधणीची शिवमंदिरे प्रामुख्याने दिसतात.
टाहाकारी हे गाव अकोले तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील गाव आहे. येथील जगदंबा मंदिर पुरातन हेमाडपंती स्थापत्यशैली मंदिर आहे. मंदिराच्या दगडींवर कलात्मक शैलीतील स्त्रियांची कोरीव मुर्त्या आहेत
टाहाकारीचे जगदंबा मंदिर हे यादवकालीन म्हणले जाते .चुन्याचा दर्जा न भरता घडीव दगडांवर दगड रचून तयार केलेली वास्तू हे हेमाडपंती मंदिरांचे वैशिष्ट्य मानले जाते. बांधकाम करण्यासाठी चुना, माती न वापरल्याने या मंदिरांचे बांधकाम कोरडे आहे. दगडांवरील सुबक शिल्पकला आणि पटईची छते या मंदिरांना एक आगळे रूप प्रदान करतात. या मंदिरांची बांधकामे यादव काळात सुरू झाली असावी असा सर्वसाधारण समज आहे.
हे मंदिर जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा हे मंदिर बांधले गेले आहे असे मानले जाते .पण पुढे मोगल राजवटीत मंदिरचा कळस तोडले गेला आणि शिवाजी महाराजायांचाया काळात तो पुन्हा बांधला गेला.जेव्हा गरुड रावण युद्धानंतर रावण विश्रांतीसाठी याच मंदिरात थांबला आणि सीतामातेने याच मंदिरात टाहो फोडला म्हणून गावाचे नाव टाहोकारी आसे पडले .पुढे त्याचा अपभ्र्वांश होऊवन टाहाकारी असे नाव पडले .जेव्हा शिवाजी महाराजांची आग्र्यावरून सुटका झाली तेव्हा ते साधूच्या वेश्यात मंदिरात राहून गेले.
मंदिरांच्या मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ,
गाभारा चौकोनी व सभांडपाला अनेक अलंकृत खांब. खांबांवर व छत्तावर पौराणिक प्रसंगांची चित्रे कोरलेली असतात. काही ठिकाणी कमानी काढून सभामंडपाला आधार दिलेला असतो. दर्शनी भाग भोजमंडप असतो. भिंती कोनयुक्त असतात. सर्व बांधकाम काळ्या दगडात असते. देवालये पूर्वाभिमुख असतात. ह्या देवालयांचे चिरे त्रिकोण, चौकोन, पंचकोन, वर्तुळ, अर्धवर्तुळ इत्यादी आकारांत घडवून ते एकमेकांत इतक्या कुशलतेने बसवलेले असतात की त्यामुळे इमारतीच्या प्रत्येक अवयवाला दुस-याचा आधार मिळून छत बिनधोक राहू शकते. देवालयात शृंगारिक शिल्पे आढळतात.तेव्हा असे मानले जाते कि कलियुगात काय घडणार आहे हे तेव्हाच रेखाटून तेवले आहे .
हे मंदिर सायाद्रीच्या रांगेत आहे .आणि सायाद्रीच्या रांगेत प्रचंड पाऊस पडतो. त्यामुळे मंदिराची झीज होत आहे .मंदिर पर्यटकांन स्थळ म्हणून सरकारने घोषित केले आहे झाडीपट्टी म्हणून ओळखण्यात येणारा अकोले तालुक्यात अनेक निसर्गसौंदर्य आणि पर्यावरणाने नटलेला आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या मंदिर पर्यटनस्थळे निर्माण केल्यास पर्यटकांना याचा आनंद घेता येऊ शकतो. परंतु, स्थानिक लोक.प्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे या पर्यटन क्षेत्रांचा विकास होऊ शकला नाही . पर्यटनस्थळांच्या विकासाची महत्त्वाकांक्षी योजना कागदावरच राहिल्याने नजीकच्या काळात मंदिराची पर्यटनदृष्टीने व्यापक विकास होण्याची शक्यता धूसर बनली आहे.मंदिराची झीज रोखण्याचा प्रयत्न गावकरी गाव वर्गणीतून करत आहे ,परंतु तो पुरेसा नाही .पर्यटनस्थळाचा विकास करून मंदिर पडण्यापासून वाचवावा हीच सरकारकडू आशा !!!!!